हे हिंदुशक्तिसंभूत दीप्तितम तेजा
हे हिंदु तपस्यापूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री सौभाग्यभूतीच्या साजा
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा ||धृ||
करि हिंदुराष्ट्र हे तू ते – वंदना
करि अंतःकरण तुज – अभिनंदना
तव चरणि भक्तिच्या चर्वी – चंदना
गूढाशी पुरवी त्या न कथू शकतो ज्या ||१||
जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पाच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतीत खलासी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पददली तुडवी
ती शुद्धि हे तुझ्या कर्मी – राहू दे
ती बुद्धि भाबड्या जीवा – लाहू दे
ती शक्ति शोणितामाजी – वाहू दे
तो मंत्र पुन्हा तो दिला समर्थे तुज ज्या ||२|