“कधी कधी शेवट कसा होईल ह्याचा विचार करतांना
शेवट होऊनही जातो
परंतु आपली मात्र सुरुवात देखील झाली नसते.
कधी कधी शेवट पर्यंत सुरुवात सापडतच नाही
आणि एखादा शेवट मात्र एखादी सुरुवात देवून जातो.
दिव्यांची ज्योत काय अथवा माणसांची स्वप्ने काय
ह्यांचा शेवट घोर अंधाराच्या उदरात ठरलेला असतो.
कधी कधी शेवट हाताशीच असतो
शोधावी लागते ती फक्त सुरुवात.”