उसळत्या रक्तात माँ ज्वालामुखीचा दाह दे
वादळाची दे गती पण भान ध्येयाचे असूं दे
 
कीर्तीचे आकाश जेंव्हा चंद्रज्योतींनी झळाळे
वा धनाची लाट की पायावरी येऊन लोळे
हात हा सोडू नको निर्मोहिता मज त्यात दे …
 
विसरू दे माझ्यातला मी तेथ भक्ती उसळु दे
रंग तू मी रंगणारा दंग त्यातच होऊ दे
कापराचे भाग्य मजसी अनुभवा आणून दे ….
 
ध्येय पथ जो चालतो मी विसर त्याचा मज नसावा
गीत आणि स्वर तुझा माझिया कंठात यावा
तव पदी हो सांगता ही जीवनाची आस दे …..
 
चेतलेला पोत आतां विझून जावा ना कधी
निर्झराला सागराचा विसर व्हावा ना कधी
वैभवाचे दान देता वैष्णवाचे वाण दे …..