मैत्री सुखाचा संवाद आहे
कधी रंगणारा वाद ही आहे.
कधी मायेचा स्पर्श हळुवार
कधी रागाचा हक्क ही आहे.
अबोलपणाचा कधी बहाणा
कधी शब्दांचा भडीमार आहे.
नमते घेण्याचा कधी नकार
कधी समंजस स्वीकार आहे.