माणसे वाचतांना
चष्मा काढून ठेवावा
जुन्या माणसांना भेटतांना नवे व्हावे
नवे पान उलटावे
पुराणा संदर्भ चाळू नये….
माणसे वाचतांना
विरामचिन्हे ऐसपैस पेरावीत.
मोकळे मन आनंदाचे महाद्वार असते.
आपले वाचन, आपणच करावे,
डोळे व कान यांत अंतर स्मरावे.
माणसे वाचतांना अडखळलेलेच बरे.
मुख्य म्हणजे,
पट्टीच्या वाचकानेही ,
आपण देखील माणूस आहोत ,हे विसरू नये.
–दीपा गोवारीकर