वदनी कवल घेता नाम घ्या मातृभूचे 

सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे 

कृषिवल – कृषिकर्मी राबती दिनरात 

श्रमिक श्रम करोनि वस्तू या निर्मितात 

करुनि स्मरण त्यांचे अन्न सेवा खुशाल  

उदर भरण आहे चित्त होण्या विशाल