तुमची मुलें तुमची मुलें नाहीत
ती, जीवनाच्या इच्छेनुसार, त्याची मुलें आहेत.
ती तुमच्या द्वारे आली आहेत, तुमच्या पासून नव्हे
आणि तुमच्या जवळ जरी ती असली तरी ती तुमची नव्हेत.
तुम्ही त्यांना आपले प्रेम देऊ शकता परंतु तुमचे विचार नाही
कारण त्यांना त्यांचे स्वतःचे विचार आहेत.
तुम्ही त्यांच्या शरीराला आसरा देऊ शकाल
परंतु त्यांच्या आत्म्यांना नाही
कारण त्यांच्या आत्म्याला भविष्याचा आसरा आहे
जेथे तुम्ही स्वप्नातही जाऊ शकणार नाही.
तुम्ही त्यांच्यासारखे बानू शकता
परंतु त्यांना तुमच्यासारखे बनविण्याची इच्छा बाळगू नका
कारण जीवनाची दिशा मागे जात नसते, भूतकाळात रेंगाळत साठे.
तुम्ही धनुष्य आहात तुमची मुले जीवंत बाण आहेत पुढे जाणारे
तो महान धनुर्धारी भविष्यातील अनंताच्या पथावरील खुणा बघत असतो.
तो तुम्हाला आपल्या शक्तीनिशी खूप वाकवतो जेणे करून बाण वेगाने दूर जावेत.
हे वाकणे तुम्हाला आनंददायक वाटू दे, कारण त्याला पुढे जाणारे बाण जितके प्रिय आहेत
तितकेच त्याला प्रिय आहेत धनुष्ये देखील, जी स्थिर आहेत.
-खलिल जिब्रान