कालनदीच्या पैलावरुनी
ऐलावरती घुटमळली घागर
हलली, कलली, डुचमळली पण
निसटून गेली गिळण्या सागर ||

कलती घागर कळण्याआधी
भरुनि घेतली ओंजळ वेगे
ओंजळीतल्या जळात गहिरा
कृष्ण होऊनी सागर रांगे ||

रिती करूनी घागर येथे
निघून गेला कृष्ण खेळीया
भयचकीत मी अन् माझ्यासह
ओंजळीमध्ये प्रश्न- कालिया ||

ग्रेस