उघडं वाघडं मन …
उघडं वाघडं मन,त्यांत काही बाही येतं
कसं नुसं होऊन ते नासून नासून जातं
तापलेलं मन उकळायला लागतं
उतू उतू येतं अन् विस्तावातच जळतं.
म्हणून मनाला म्हणतो ,
नेमक्या अंशावर नेमकं तापावं
आणि हळूच आपसूक थंडावून
मुलायम साय साय व्हावं.
पण मनाला वाटते कुणी ओरबाडायची भीती
इथे तर मन मनातून मांजर पावलांची वस्ती .