आई असते वृक्षासारखी
सारं काही देतच असते
आई असते नदीसारखी
सतत पुढे जातच असते
आई असते पर्वतासारखी
संकटात ठाम उभी असते
आई असते झऱ्यासारखी
आनंदात खळखळ हसत असते
आई असते ताऱ्यासारखी
अंधारात मार्ग दाखवत असते
आई असते समुद्रासारखी
सुखदुःख पोटात सामावून घेते
आई असते सुगंधासारखी
अस्तित्वानं मन सुखावत असते
आई असते निसर्गासारखी
तिथे नकली काहीच नसते
आई असते देवासारखी
सारखी कसची
देवच असते.
आई एक असते धागा –
समईच्या वातीला उजेड दावणारी एक जागा
(समईचा उजेड आपल्याला दिसतो, तीचं तापणं कुठे जाणवतं ?)
तभा. आसमंत/ १०.८.२००८